Home > Max Political > सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे पाच पर्याय..

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे पाच पर्याय..

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे पाच पर्याय..
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. जनतेनं भाजप शिवसेना युतीला कौल दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना अडवून बसल्यानं भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अशातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू केलं जाईल. असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यात राष्ट्रपती शासन लागू केलं जाईल का? त्याचबरोबर सत्ता स्थापने संदर्भात शिवसेनेला कॉंग्रेस राष्ट्रवादी पाठींबा देतील का? या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. आजच्या रोखठोकमधून ‘सामना’ चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेचे 5 पर्याय दिले आहेत.

त्यातील शिवसेना (Shivsena) भाजप यांच्यामध्ये सहमतीने सरकार बनवण्याची शक्यता जवळपास धूसर झाल्याची त्यांनी म्हटलं आहे. मात्र, तरी सुद्धा शिवसेना आणि भाजप (BJP) मिळून तडजोडी करुन सरकार बनवण्याची शक्यता ही त्यांनी 4 था पर्याय म्हणून सांगितली आहे. अहंकारामुळे हे सरकार स्थापन होत नाही असंही त्यांनी आजच्या रोखठोक मध्ये नमूद करत भाजपवर निशाणा साधला आहे.

आजच्या रोखठोक मधील सर्वात महत्वाचा पर्याय तिसरा पर्याय... या पर्यायामध्ये शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येत सरकार स्थापन करुन वाजपेयी यांनी जसं सामजस्याने सरकार चालवलं तसं सरकार चालवता येऊ शकतं. या पर्यायाचाही उल्लेख केला आहे.

शिवसेनेला पाचव्या पर्यायाची भीती...

पाचव्या पर्यायामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांना पाचव्या पर्यायाची भीती वाटते. यामध्ये ईडी, पैसा, पोलिस, यांचा धाक दाखवून भाजपने इतर पक्षाचे आमदार फोडून सरकार बनवावं लागेल. मात्र, हा पर्याय काम करणार नाही. असं सामनानं म्हटलं आहे.

राष्ट्रपती राजवटीची जी भीती दाखवण्यात येते यावर देखील शिवसेनेने टीका केलेली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख राजकारणी आहेत. ते अडचणीत का आलेले आहेत. याबाबत संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे.

रोखठोक मधील सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे गोपिनाथ मुंडे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. मात्र, या ओळीतून एक अर्थ स्पष्ट होतो. तो म्हणजे सेनेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मान्य नाहीत का? कारण गोपिनाथ मुंडे हे भाजपचे मुख्यमंत्री झाले असते आणि देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) हे देखील भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. मात्र, शिवसेनेला आज गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) मुख्यमंत्री म्हणून चालले असते. तसा उल्लेख सामनातून करण्यात आला आहे. त्यामुळे सेनेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मान्य नाहीत का? असा सवाल देखील आजच्या रोखठोक मधून उपस्थित होतो.

Updated : 3 Nov 2019 4:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top