Big News : पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊत यांचे मोठे विधान

courtesy- Social media

“आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वत: हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये असं मी म्हटलं.

आता पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे” पंकजा मुंडे यांनी अशी पोस्ट टाकल्यानंतर राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

हे ही वाचा…

शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार- भगतसिंह कोश्यारी

फडणवीस केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री झाले- अनंत हेगडे

जमिनी सत्याला डावी अथवा उजवी बाजू नसते – संजीव चांदोरकर

पंकजा मुंडे (Pankaja Munde) शिवसेनेत (Shiv Sena)  प्रवेश करणार असं देखील बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकांउटवरुन भाजपचा उल्लेख देखील हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

या संदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सवाल केला असता, त्यांनी पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच कळेल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत. राज्यात आता आमचं सरकार विराजमान झालं आहे. असं म्हणत पंकजा मुंडे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं दावाच संजय राऊत यांनी केला आहे.