Top
Home > News Update > संजय दत्त हॉस्पिटलमध्ये, कोरोना चाचणीनंतर फॅन्सना आवाहन

संजय दत्त हॉस्पिटलमध्ये, कोरोना चाचणीनंतर फॅन्सना आवाहन

संजय दत्त हॉस्पिटलमध्ये, कोरोना चाचणीनंतर फॅन्सना आवाहन
X

अभिनेता संजय दत्त याला शनिवारी लिलावती हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर संजय दत्तला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

संजय दत्तने स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “माझी प्रकृती व्यवस्थित आहे. माझी नुकतीच कोरोनाची चाचणी झाली असून तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

लिलावती हॉस्पिटलमधले डॉक्टर, नर्सेस आणि सर्व कर्मचारी उत्तम काळजी घेत असल्याने येत्या 1 ते 2 दिवसात मला घरी जाता येईल, सर्वांना दिलेल्या आशिर्वाद आणि शुभेच्छांबद्दल आभार”, असे संजय दत्त्ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय दत्तला कोरोनाची लागण झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. दरम्यान संजय दत्तची प्रकृती व्यवस्थित असून त्याला आणखी काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Updated : 9 Aug 2020 1:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top