Home > News Update > सांगली जिल्हा बॅंक निवडणूक: संचालक प्रताप पाटील यांची भाजप विरोधात बंडखोरी

सांगली जिल्हा बॅंक निवडणूक: संचालक प्रताप पाटील यांची भाजप विरोधात बंडखोरी

सांगली जिल्हा बॅंक निवडणूक: संचालक प्रताप पाटील यांची भाजप विरोधात बंडखोरी
X

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये महाविकासआघाडी व भाजप हे आमना सामने लढत आहेत. महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल असून भाजपचे शेतकरी पॅनेल आहे. 18 जागेसाठी 43 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे 18 अर्ज आहेत. तर भाजप प्रणित शेतकरी पॅनेलचे 17 अर्ज दाखल आहेत. तर 8 बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

त्यामुळं ऐन थंडीच्या दिवसात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप व महाविकास आघाडी समोरासमोर असून आठ बंडखोर उमेदवार आहेत. त्यामध्ये सोसायटी गटातून तासगावचे बंडखोर उमेदवार प्रताप पाटील हे उभे आहेत.

यंदाची निवडणूक त्यांना कशी वाटते. त्यांचा या निवडणूकीत काय अजेंडा आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने त्यांच्याशी बातचीत केली. प्रताप पाटील हे सध्या विद्यमान संचालक आहेत. मागील पाच वर्षांमध्ये जी कामे केली त्या कामाच्या जोरावर मी निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप पाटील यांनी दिली. तुम्ही गेल्या 5 वर्षात कोणती काम केली? तुम्हाला लोकांनी पुन्हा निवडून का द्यायचं? असा प्रश्न त्यांना केला असता,

प्रताप पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये मी बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील सोसायटी यांना भरघोस कसे निधी दिलेला आहे. वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. शेतकऱ्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मध्य मुदतीचे कर्ज देण्यात येत होते. त्या वरती दहा टक्के ठेव घेण्यात येत होती. ती आम्ही रद्द केली.

सामान्य कर्जाचा प्रकार हा आम्ही पहिल्यांदाच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राबवलेला आहे. यामध्ये अडीच लाखापर्यंत सामान्य कर्ज देण्याची योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवली आहे.

तासगाव तालुक्यामध्ये गटातटाचे राजकारण न करता शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम केले आहे. शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करण्याची इच्छा असल्याचे मत प्रताप पाटील यांनी व्यक्त केले. मी माझ्या केलेल्या कामावर माझी उमेदवारी जाहीर केली आहे. आणि माझ्या कामाच्या जोरावर निवडून येणार असल्याचं प्रताप पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Updated : 16 Nov 2021 5:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top