Home > News Update > लाचेचा आरोप झाल्याने समीर वानखेडे यांची चौकशी होणार; NCBचे ज्ञानेश्वर सिंह करणार चौकशी

लाचेचा आरोप झाल्याने समीर वानखेडे यांची चौकशी होणार; NCBचे ज्ञानेश्वर सिंह करणार चौकशी

लाचेचा आरोप झाल्याने समीर वानखेडे यांची चौकशी होणार; NCBचे ज्ञानेश्वर सिंह करणार चौकशी
X

आर्यन खान अटक प्रकणातील पंच प्रभाकर साईल यांनी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाचेचा आरोप केल्यामुळे त्यांची अंतर्गत चौकशी होणार आहे. वानखेडे उद्या दिल्लीत जाणार आहेत. NCB च्या उत्तर विभागाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह या प्रकरणी चौकशी करणार आहेत. आपल्याकडून दहा कोऱ्या कागदांवर NCB च्या अधिकाऱ्यांनी सह्या घेतल्याचा दावा देखील पंच साईल यांनी केला. शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये लाच मागण्यात आली. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडे यांना मिळणार होते, असा आरोप साईल यांनी केला. दरम्यान संबंधित चित्रफीत व प्रतिज्ञापत्र समोर आल्यानंतर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे. मात्र, NCB ने ज्ञानेश्वर सिंह यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. याबाबत सिंह म्हणाले की, संबंधित कागदपत्रे मला मिळाली आहेत. त्या आरोपांची चौकशी पारदर्शक होईल. साईल यांचीही NCB चे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान या प्रकरणातील दुसरा पंच आणि नोकरीचे आमिष देऊन पुण्यातील युवकाची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला किरण गोसावीने लखनऊ पोलिसांना आत्मसर्पण करण्याबाबत केलेल्या फोनची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, मात्र लखनऊ पोलिसांनी त्याला साफ नकार दिल्याचे या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान किरण गोसावी हा लखनऊत असल्याचे समजताच पुणे पोलिसांचे एक पथक लखनऊकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान वानखेडे यांच्यावर लाचेची मागणी केल्याचा आरोप झाल्याने यावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांचे काही जुने फोटो आणि कागदपत्रे ट्वीट करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण वानखेडे यांच्या भोवती फिरत आहे.

Updated : 26 Oct 2021 2:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top