Home > News Update > ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी दाखवून देऊ: राणेंचा संभाजीराजेंनी घेतला समाचार

ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी दाखवून देऊ: राणेंचा संभाजीराजेंनी घेतला समाचार

ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी दाखवून देऊ: राणेंचा संभाजीराजेंनी घेतला समाचार
X

मुंबई: छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही,अशी टीका करणारे भाजप नेते नारायण राणेंचा खासदार संभाजीराजेंनी समाचार घेतला आहे.संभाजीराजे यांनी ट्वीट करत, ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी दाखवून देऊ,असा टोला राणेंना लगावला आहे.

नारायण राणे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी राजेंवर जहरी टीका केली होती. "छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.

राणेंनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना संभाजीराजे म्हणाले की, "छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू," असा टोला संभाजीराजेंनी राणेंना लगावला.


तसेच ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,असं संभाजीराजे म्हणाले.

Updated : 4 Jun 2021 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top