Home > News Update > जोधा-अकबर दंगल प्रकरणी संभाजी भिडे जामीनावर

जोधा-अकबर दंगल प्रकरणी संभाजी भिडे जामीनावर

जोधा-अकबर दंगल प्रकरणी संभाजी भिडे जामीनावर
X

सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंसह तीन आरोपींची २००८ च्या जोधाअकबर चित्रपट दंगलीप्रकरणी आज सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आहे.

जोधाअकबर चित्रपटाच्या विरोधावरून सांगलीत 2008 ला झालेली दंगल प्रकरण घडले होते. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या सहित संशयित 90 आरोपी सांगली न्यायालयात हजर केले होते. एकूण 94 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

चित्रपट प्रदर्शना विरोध आणि त्यांनतर पोलिसांनी आंदोलकांना अटकाव केल्या नंतर सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यावेळी सांगलीत संचारबंदीपण लागू केली होती. एस. टी बसेस आणि सार्वजनिक मालमत्तेच नुकसान सुद्धा झालं होतं.या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी सहित 3 जणांचा जमीन मंजूर करण्यात आल्याचं आरोपी संभाजी भिडेंची वकिल ऍड. मंगेश तांदळे यांनी सांगितलं.

Updated : 27 Jan 2022 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top