Home > News Update > संभाजी भिडे यांनी उतरवला आमदाराचा मास्क

संभाजी भिडे यांनी उतरवला आमदाराचा मास्क

वादग्रस्त श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नेहमी चर्चेत असतात, यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमदाराचा मास्क काढून उद्घाटन करायला लावल्यामुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

संभाजी भिडे यांनी उतरवला आमदाराचा मास्क
X

कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या चिंतेने महाराष्ट्र चिंतेत आहे. महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. चौकाचौकात पोलीस मास्क नसलेल्या नागरिकांवर दंड आकारत आहेत.

अशा स्थितीत एका कार्यक्रमात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना आधी मास्क काढा आणि मग उद्घाटन करा असे फर्मावले. आमदारांनी हा आदेश मानत स्वतःच्या तोंडावरचा मास्क उतरवला. गर्दीत होत असलेल्या या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क घातलेला नव्हता. व त्यांनी आमदारांनी घातलेला मास्क देखील उतरवायला लावला

ही घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील आळसंद या गावात. आमदार अनिल बाबर तसेच संभाजी भिडे एका दुकानाच्या उद्घाटन समारंभासाठी एकत्र आले होते.


Updated : 25 Feb 2021 8:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top