Home > News Update > भिडे गुरूजी सायकलवरून पडले, माकडहाड मोडलं...

भिडे गुरूजी सायकलवरून पडले, माकडहाड मोडलं...

भिडे गुरूजी सायकलवरून पडले, माकडहाड मोडलं...
X

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) उर्फ भिडे गुरूजी (Bhide Guruji) यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. भिडे गुरुजी सायकल चालवत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यामुळे ते खाली जमिनीवर पडले. या अपघआतात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात माकडहाड मोडल्याची देखील माहिती आहे.

त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडे हे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून जात होते. पण या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

संभाजी भिडे यांच्यावर प्रेम करणारा राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची बोलण्याची शैली अनेकांना आवडते. त्यामुळे भिडे गुरुजींच्या अपघाताची बातमी अनेकांसाठी धक्कादायक समजली जातेय. भिडे गुरुजींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सर्वांकडून केली जात आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. भिडे गुरुजी आजही सायकलनेच प्रवास करतात. त्यामुळे अनेकांना या गोष्टींचं अप्रुप वाटतं.

अपघाताची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे (वय ८३) बुधवारी सायंकाळी गणपती पेठेतून गणेश मंदिराकडे सायकल वरून निघाले होते. वळणावर अचानक ते सायकलवरून पडले. त्यांनातत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्यांना भारती रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सायकलवरून पडल्याने आज (बुधवार) जखमी झाले. त्यांच्या खुब्याला दुखापत झाली असून उपचारासाठी भारती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

संभाजी भिडे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळेही प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला आहे. कोरोनाच्या काळात 'कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत. मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नाही', असं धक्कादायक विधान देखील भिडे यांनी याआधी केलं होतं.

Updated : 27 April 2022 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top