Home > News Update > Salman Khan | सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका

Salman Khan | सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका

Salman Khan | सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका
X

Bollywood | काळवीट हत्येप्रकरणी अडकलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकी दिल्यामुळे बिश्नोई (Bhishnoi)चर्चेत आला होता. एका मुलाखतीत लॉरेन्सने पुन्हा एकदा सांगितलं की सलमानने त्यांच्या समाजाची माफी मागायला हवी. त्यातनंतर आता पुन्हा रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सालमन खानला परत धमकी देण्यात आली आहे. धमकी देनारी पोस्ट सोशल मिडियावर पाहिल्यावर मुंबई पोलिसांनी लगेचच सलमानच्या सुरेकक्षेचा बंदोबस्त वाढवला आहे.

लॉरेन्सच्या धमकीनंतर सालमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही पोस्ट पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला उद्देशून होती. “तू सलमान खानला भाऊ मानतोस, पण आता वेळ आली आहे की तुझ्या भावाने समोर येऊन तुला वाचवावं” ही धमकीची पोस्ट फेसबुक(Facebook) या माध्य़माद्वारे केली गेली आहे. अशी आहे धमकीची पोस्ट “हा संदेश सलमान खानसाठीही आहे. तुला दाऊद वाचवेल या भ्रमात राहू नकोस. तुला कोणीच वाचवू शकत नाही. सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) मृत्यूनंतर तू दिलेल्या नाट्यमयी प्रतिक्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हा सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की तू व्यक्ती म्हणून कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध कसे होते? तू आमच्या रडारवर आहेस. याला ट्रेलर असं समज, संपूर्ण चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. तुला ज्या देशात पळायचं असेल तिथे पळ. सोशल मिडियावरील पोस्ट नक्की कोणी लिहिली व त्या सोशल मीडिया अकाऊंट खरंच बिश्नोईचं आहे का ? याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.

Updated : 29 Nov 2023 12:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top