Home > News Update > फडणवीसांच्या काळात किती विभागांची पगार खाती एक्सिस बँकेत वळवली, अर्थविभाग अंधारातच !

फडणवीसांच्या काळात किती विभागांची पगार खाती एक्सिस बँकेत वळवली, अर्थविभाग अंधारातच !

फडणवीसांच्या काळात किती विभागांची पगार खाती एक्सिस बँकेत वळवली, अर्थविभाग अंधारातच !
X

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमध्ये किती खाती सुरू केली होती याची एकत्रित माहिती वित्त विभागाकडे उपलब्धच नसल्याचं धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झालंय. संजय गुरव यांनी माहिती अधिकारांतर्गत वित्त विभागाकडे माहिती मागितली होती. त्याला दिलेल्या उत्तरात अर्थ विभागानं हे स्पष्टीकरण दिलंय.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्या बँकेमार्फत करावे याचे निर्देश वित्तविभागाने दिलेले नाहीत, पण संबंधित विभागातील जास्तीत जास्त कर्मचारी परित्रकात नमूद केलेल्या बँकांपैकी ज्या बँकेची निवड करतील त्या बँकेमार्फत वेतन देण्याची मुभा प्रत्येक शासकीय विभागाला देण्यात आल्याचंही या उत्तरात स्पष्ट करण्यात आलंय.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर राज्यातील पोलिसांचे वेतन एक्सिस बँकेमार्फत करण्याचा राबवण्यात आला होता. त्याचबरोबर इतरही काही विभागांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन एक्सिस बँकेमार्फत करण्याचा निर्णय़ घेण्यात आला होता.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanavis) या एक्सिस बँकेत (Axis Bank) मोठ्या पदावर कार्यरत असल्यानं एक्सिस बँकेला झुकतं माप दिलं गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसंच नुकतेच सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीसुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन एक्सिस बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान फडणवीस यांच्या कार्यकाळात प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांच्या पसंतीनुसार एक्सिस बँकेची निवड करण्यात आली होती की कर्मचाऱ्यांवर हा निर्णय लादण्यात आला होता, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे सरकार आता याचीही चौकशी करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.

याच विषयावर माहिती आधिकार कार्यकर्ता संजय गुरव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/466249264273481/?t=22

Updated : 27 Dec 2019 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top