Home > News Update > आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाची जबाबदारी स्वीकारून राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा-भाजप

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाची जबाबदारी स्वीकारून राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा-भाजप

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाची जबाबदारी स्वीकारून राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा-भाजप
X

मुंबई // आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी अनेक केंद्रावर गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. शहरातील काही केंद्रावर परीक्षा उशिरा सुरू झाल्याने गोंधळ उडाला होता तर काही केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना हे पेपर देण्यापासून वंचित रहावे लागलं होतं. परीक्षेतील या गोंधळामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी हे परीक्षा पासून वंचित राहिले. तरी सरकारने या विद्यार्थ्यांकरीता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करू आणि सरकार विरोध आंदोलन करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत रविवारी तिसऱ्यांदा गोंधळ उडाला होता. परीक्षावेळी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली होता. या सर्व गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार आहेत. त्यांनी या गोंधळाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली होती.

न्यासा या कंपनीने केलेल्या गोंधळामुळेपरीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. उत्तर प्रदेश आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आज परीक्षेत उडालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली.

Updated : 4 Nov 2021 3:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top