Home > News Update > हिंमत असेल तर राज्य सरकारला जाब विचारा - सदाभाऊ खोत

हिंमत असेल तर राज्य सरकारला जाब विचारा - सदाभाऊ खोत

हिंमत असेल तर राज्य सरकारला जाब विचारा - सदाभाऊ खोत
X

कोल्हापूर : 'आज जे आंदोलन करत आहेत ते राज्य सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाहीत', शेतकऱ्यांची बाजू न घेता कारखानादाराची बाजू घेत एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला दिला, हिंमत असेल तर राज्य सरकारला जाब विचारा असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे.ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान एफआरपीचे तुकडे करण्यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला अद्याप जाब का विचारला नाही? एफआरपीसाठी एकेकाळी ते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगणात जाऊन बसले मग आता तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा प्रस्ताव राज्याचे सहकार खाते केंद्राला शिफारस करत असेल तर सहकार मंत्र्यांच्या दारात कधी बसणार? असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उद्देशून खोत यांनी केला आहे.

एक बाजूला सहकारमध्ये राहुन शिफारशीला मूकसमंती द्यायची आणि दुसरीकडे आंदोलन करायचे ही दुटप्पी भूमिका असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. केंद्राने यापूर्वीच ठरवले आहे की एफआरपीचे तुकडे करायचे नाहीत, मात्र याचे श्रेय घेण्यासाठी एका नेत्यांची धडपड सुरू आहे.असा घणाघात खोत यांनी केला.दरम्यान यासाठी ५ ऑक्टोबरला राज्य सरकारच्या विरोधात सोलापुरात येथे जागर एफआरपी आणि एल्गार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोर्चा रयत क्रांती संघटनेच्या वतीने काढणार असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली.

Updated : 26 Sep 2021 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top