Home > News Update > सचिन तेंडुलकरच्या नावाने खोट्या जाहिराती, सचिनचा कारवाईचा इशारा

सचिन तेंडुलकरच्या नावाने खोट्या जाहिराती, सचिनचा कारवाईचा इशारा

सचिन तेंडुलकरच्या नावाने खोट्या जाहिराती, सचिनचा कारवाईचा इशारा
X

Photo courtesy : social media

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र सचिन तेंडुलकरने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. सचिन सध्या त्याच्या नावाने व्हायरल झालेल्या खोट्या जाहिरातींमुळे त्रस्त झाला आहे. त्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत झाले आहेत. या फोटोंमध्ये सचिन कसिनोची जाहिरात करताना दिसत आहे. पण या जाहिराती खोट्या असल्याचे सचिनने म्हटले आहे. तसेच यावर आपले एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

"सध्या सोशल मीडियावर माझे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरुन मी कसिनोची जाहिरात करत असल्याचे दाखवले आहे. पण आपण कधीही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जुगार, दारु किंवा तंबाखूची जाहिरात केलेली नाही. पण माझ्या प्रतिमेचा असा गैरवापर केला जात असून लोकांची दिशाभूल केली जाते असेल तर याबाबत सजग असले पाहिजे" असे सचिनने म्हटल आहे. तसेच कायदे विषयक सल्लागार टीम यावर योग्य ती कारवाई करेल, पण लोकांनीही या खोट्या जाहिरातींपासून सावध राहावे असे आवाहन सचिनने केले आहे.

Updated : 25 Feb 2022 8:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top