Home > News Update > चिमुकल्या फिरकीपटूचा सचिन तेंडुलकर झाला फॅन; व्हिडिओ शेअर करत केले कौतुक

चिमुकल्या फिरकीपटूचा सचिन तेंडुलकर झाला फॅन; व्हिडिओ शेअर करत केले कौतुक

चिमुकल्या फिरकीपटूचा सचिन तेंडुलकर झाला फॅन; व्हिडिओ शेअर करत केले कौतुक
X

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नेहमीच प्रतिभावान खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या अप्रतिम खेळाचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करतो. सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत असतानाही सचिन अनेकदा ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना मोलाचे सल्ले देत दिसतो. सचिन क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी तो क्रिकेटपासून अजिबात दूर नाही.



सचिनने नुकताच एका चिमुकल्याचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात एक छोटा मुलगा उत्कृष्ट अशी फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे. सचिननेही या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक केलं आहे.


सचिनने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, 'वाह! हा व्हिडीओ मला एका मित्राकडून मिळाला.हा व्हिडीओ अप्रतिम आहे. खेळाप्रती या चिमुकल्याचं प्रेम कमालीचं आहे.' या व्हिडीओमधील चिमुकला लेग-ब्रेक गोलंदाजी करत आहे. तो छोट्याशा व्हिडीओ क्लिपमध्ये विविध प्रकारे फलंदाजाला चकवा देताना दिसतो. तो अगदी मजा घेऊन खेळताना दिसत आहे हे विशेष!

Updated : 17 Oct 2021 2:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top