Home > News Update > स्वच्छ मुखासाठी सचिन तेंडूलकरने उंचावला तिरंगा

स्वच्छ मुखासाठी सचिन तेंडूलकरने उंचावला तिरंगा

स्वच्छ मुखासाठी सचिन तेंडूलकरने उंचावला तिरंगा
X


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर नेहमीच कसल्या ना कसल्या मुद्यावर चर्चेत असतो. ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याने देशाचा तिरंगा पुन्हा एकदा उंचावलाय. त्याने महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने आरोग्यासाठी स्वच्छ मुख अभियानाचा तिरंगा हाती घेतला आहे.

सचिनने सध्या एक महत्वाची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जगभरातून त्याचं कौतुक होत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागातून "स्वच्छ मुख अभियानात" त्याने सहभाग नोंदवला आहे. या संदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या खात्यावरून ट्विट करण्यात आलं आहे. भारताचा तिरंगा हातात घेत "स्वच्छ मुखाचे राखुनी भान...हृदयी फुलवू अमृत गान..." अशा पद्धतीची पोस्ट करण्यातं आली आहे. यावेळी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा ही महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागातून देण्यात आल्या आहेत.

Updated : 15 Aug 2023 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top