Home > News Update > भगव्याचे शिवसेनेला पेटंट दिलेलं नाही: प्रवीण दरेकर

भगव्याचे शिवसेनेला पेटंट दिलेलं नाही: प्रवीण दरेकर

भगव्याचे शिवसेनेला पेटंट दिलेलं नाही: प्रवीण दरेकर
X

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणता, आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही. जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीनंतर कळेलच, भगवा कोणाचा आहे. भगव्याचे शिवसेनेला पेटंट दिलेलं नाही, अशा शब्दात विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

राज्यात गेल्या वर्षभरात ठाकरे सरकारची परिस्थिती पाहिली तर कोणाचा कोणाला मेळ नाही, सुसंवाद नाही, अशी परिस्थिती आहे तर देशभरात भाजपच्या पाठीशी मतदार असल्याचे चित्र पाहता पुणे पदवीधर निवडणुकीत मतदार संग्राम देशमुख यांना निवडून देतील. पदवीधरांसमोर आज नोकरीचा प्रश्न आहे, आमचे उमेदवार हे पदवीधरांच्या नोकरी, स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहेत.

वीज बिल बाबत कोरोना काळातजी अवाजवी बिल आली हे सरकारला संकट काळात शोभणारे नाही, ग्राहक मेळावा होऊ देणार नाही उधळून लावून, याबाबत निर्णय झाल्याशिवाय असे मेळावे होऊ देणार नाही. सामना म्हणजे काय महाराष्ट्राला दिशा देणारे मुखपत्र आहे का त्यात आलेल्या बातमीवर प्रतिक्रिया द्यायला. राज्यात शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, शिक्षण मंत्री राज्यमंत्री सरकार म्हणून वेगळं बोलले जाते आहे या सरकारने शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ लावला आहे. कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत.

नितीन राऊत यांनी 100 युनिट पर्यत सवलत देण्याचे जाहीर केले होते त्यांना तोंडावर आपटवण्याचे काम शिवसेना आणि राष्ट्रवादी करतायत कॉंग्रेसने आपली फरफट होऊ देऊ नये त्यांनी त्याची भूमिका मांडावी. संजय राऊत हे पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेले दिसले फडणवीस यांनी विचारलेल्या आठ दहा प्रश्नावर राऊत बोलू शकले नाही,मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणता, आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही. जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा त्यामुळे मुंबई निवडणुकीनंतर कळेलच, भगवा कोणाचा आहे. भगव्याचे शिवसेनेला पेटंट दिलेलं नाही असं दरेकर शेवटी म्हणाले.


Updated : 19 Nov 2020 8:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top