Home > Election 2020 > एकमेव आमदारवाल्यांचं शॅडो कॅबिनेट ; शिवसेनेकडून मनसेची खिल्ली

एकमेव आमदारवाल्यांचं शॅडो कॅबिनेट ; शिवसेनेकडून मनसेची खिल्ली

एकमेव आमदारवाल्यांचं शॅडो कॅबिनेट ; शिवसेनेकडून मनसेची खिल्ली
X

शॅडो कॅबिनेट चा प्रयोग म्हणजे "हा खेळ सावल्यांचा" नाट्यप्रयोग ठरू नये, अशी टीका करत शिवसेनेने मनसेच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. १०५ आमदारवाल्या प्रकर्षाने शॅडो मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो की काय ते बनवले, अशा शब्दांत सामना च्या संपादक रश्मी ठाकरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेट चा समाचार घेतला आहे.

साधारणतः प्रमुख विरोधी पक्षामार्फत शॅडो कॅबिनेट राबवलं जातं पण राज्यात विरोधी पक्ष अजून बादशाही भुमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. आणि एकमेव आमदारवाले शॅडो बनवतात, त्याचेही मुख्यमंत्रीपद रिकामेच; या शॅडो मंत्रिमडळाला शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरलं असतं, म्हणजे खेळ सावल्यांचा अधिकच रंगतदार झाला असता, असा चिमटा रश्मी ठाकरेंनी मनसेला काढला आहे.

शॅडोची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना "जपून करा; ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका". छाया मंत्रिमंडळात अशी तंबी द्यावी लागली, हा उल्लेख करत रश्मी ठाकरे यांनी अनुभव माणसाला शहाणपण शिकवतो, तो असा कामास येतो असा जोरदार टोलाही लगावला आहे.

तुमचं ‘शॅलो कॅबिनेट’ विसरलात?

सामनाच्या अग्रलेखावर मनसेत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सरकारवर वचक ठेवणारं, ते चुकलं तर त्यांचे वाभाडे काढणारं आणि चांगलं काम केलं तर त्याच कौतुकही करणारं आमचं ‘शॅडो कॅबिनेट’ आहे. पण...तुमचं तर मागची ५ वर्ष सत्तेत राहून आपल्याच सरकारवर, सरकारचाच भाग बनून तुमचं ‘शॅलो कॅबिनेट’ चाललं होतं, हे विसरलात? असा उलट सवाल मनसेने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरून केला आहे.

पिक्चर तो अभी बाकी है,

मनसे नेता अमेय खोपकर यांनीही या संदर्भात ट्वीट केलंय. त्यांनी म्हटलंय की शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये, असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा !

Updated : 11 March 2020 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top