Home > News Update > Russia Ukraine war : अमेरिकेची युध्दात उडी, युक्रेनसाठी केली मोठी घोषणा

Russia Ukraine war : अमेरिकेची युध्दात उडी, युक्रेनसाठी केली मोठी घोषणा

रशिया युक्रेन युध्दाच्या 21 व्या दिवशी अमेरिकेने युक्रेनसाठी मोठी घोषणा केली आहे.

Russia Ukraine war : अमेरिकेची युध्दात उडी, युक्रेनसाठी केली मोठी घोषणा
X

रशिया युक्रेन युध्द तीन आठवड्यांपासून सुरू आहे. त्यातच रशियाने केलेल्या चर्नीव्हीव शहरावरील हल्ल्यात दहा युक्रेनच्या नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापार्श्वभुमीवर युध्दापासून लांब राहिलेल्या अमेरिकेने युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करत युध्दात उडी घेतली आहे.

रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत चालली आहे. तर दुसरीकडे चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. त्यापार्श्वभुमीवर रशियाने युक्रेनच्या चर्नीहीव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात 10 युक्रेनच्या नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत नागरिकांचा आकडा 691 इतका झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने दिली आहे. तर 30 लाखांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे एकीकडे युक्रेन रशिया संघर्ष पेटला असताना युध्दापासून लांब राहिलेल्या अमेरिकेने युक्रेनच्या मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती संसदेमध्ये दिली आहे. यामध्ये अमेरिका रशियाच्या विरोधात युक्रेनला आर्थिक मदतीसह लष्करी मदतही देणार आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 800 मिलियन डॉलरच्या डॉलरची मदत युक्रेनला देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

अमेरिकेने जाहीर केलेल्या मदतीमध्ये 800 अँटी एअर क्राफ्ट सिस्टीम्स, नऊ हजार अँटी आर्मोर मिसाईव आणि सात हजार छोट्या आकाराची शस्रे आणि लाँचर्स याबरोबरच लष्करी ड्रोन्सचाही अमेरिकेकडून पुरवठा केला जाणार आहे. तसेच जवळपास 1 बिलियन डॉलरची मदत अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनकडून अमेरिकेकडे लष्करी मदतीची मागणी केली जात होती. मात्र अमेरिकेने तातडीने मदत पाठविण्यास विलंब केला होता. मात्र आता अमेरिकेने रशियाविरोधात उडी घेत युक्रेनला लष्करी मदत पाठविल्याने युध्दाचा आणखी भडका उडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला दणका देत युध्द थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले आंतरराष्ट्रीय न्यायालय-

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे की, 24 फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनच्या भुमीवर सुरू केलेल्या लष्करी कारवाया स्थगित कराव्यात. तसेच यानंतर रशियाने लष्करी कारवाईचे कोणतेही पाऊल उचलू नये. याबरोबरच दोन्ही देशांनी वाद चिघळणाऱ्या कृतीपासून दुर रहावे, असे म्हटले आहे.

पुढे बोलताना न्यायालयाने म्हटले की, युक्रेनने रशियाला कडवी झुंज दिली आहे. तर यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने झेलेंस्की यांचे कौतूक केले. मात्र रशिया समर्थक देशांनी रशियाला लष्करी मदत न देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल रशियावर बंधनकारक असणार आहे. त्याबरोबरच रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे पालन न केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडेल. त्यामुळे रशिया आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे पालन करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Updated : 17 March 2022 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top