Home > News Update > #Russia Ukraine War : रशियाचा युरोपमधील सर्वात मोठ्या अणूउर्जा प्रकल्पावर ताबा

#Russia Ukraine War : रशियाचा युरोपमधील सर्वात मोठ्या अणूउर्जा प्रकल्पावर ताबा

रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा अणूउर्जा प्रकल्पावर हल्ला केला आहे. त्यामुळे युरोपचे टेन्शन वाढले आहे.

#Russia Ukraine War : रशियाचा युरोपमधील सर्वात मोठ्या अणूउर्जा प्रकल्पावर ताबा
X

रशिया युक्रेनमधील युध्द दिवसेंदिवस चिघळत आहे. या युध्दात रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यातच रशियाने युरोपमधील सर्वात मोठा अणूउर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे.

रशियन सैन्याने झपोरिझ्झिया अणूउर्जा प्रकल्पावर हल्ला केला आहे. हा अणू उर्जा प्रकल्प युरोपमधील सर्वात मोठा अणूउर्जा प्रकल्प आहे. तर रशियाने या प्रकल्पावर क्षेपणास्र हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात क्षेपणास्र अणूभट्टीवर पडले नाही. त्यामुळे युरोपमध्ये मोठा अणूअपघात टळला. मात्र रशियाने झपोरिझ्झिया अणूउर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्याने युरोपसह जगाची चिंता वाढली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युध्द नऊ दिवसानंतरही सुरुच आहे. तर या युध्दात रशियाने चर्निहिव्हवर बाँबवर्षाव केला आहे. या हल्ल्यात 47 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात क्षेपणास्र झपोरिझ्झिया प्रकल्पावर पडले. तर हा प्रकल्प रशियाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे युरोपचे टेन्शन वाढले आहे.

रशियाने झपोरिझ्झिया अणू उर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यानंतर चर्नोबिलपेक्षा मोठा विध्वंस होण्याची शक्यता होती. त्यापार्श्वभुमीवर अखेर अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यामुळे रशियन अधिकाऱ्यांनी आपत्कालिन पथकाला प्रकल्पाच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली. तर या प्रकल्पात लागलेली आग विझवण्यात आली.

रशियाने याठिकाणी असलेल्या अणूभट्टीवर हल्ला केल्याने युक्रेनची मोठी कोंडी होऊ शकते. कारण हा प्रकल्प चर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा आहे. त्यामुळे झपोरिझ्झिया अणूउर्जा प्रकल्प रशियाने ताब्यात घेतल्याने त्याचा आर्थिक फटका युक्रेनला होणार आहे. तसेच इतर देशांनी रशिया आणि युक्रेन युध्दात दखल देण्याचा प्रयत्न केल्यास जगाला गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी टीव्ही संदेशात म्हटले आहे.


Updated : 5 March 2022 2:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top