Home > News Update > #RussiaUkraineConflict : रशियाचे युक्रेनवर आक्रमण, अनेक शहरांमध्ये बॉम्बहल्ले

#RussiaUkraineConflict : रशियाचे युक्रेनवर आक्रमण, अनेक शहरांमध्ये बॉम्बहल्ले

#RussiaUkraineConflict : रशियाचे युक्रेनवर आक्रमण, अनेक शहरांमध्ये बॉम्बहल्ले
X

संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या रशियाने अखेर युक्रेनवर (Russia, ukraine) आक्रमण केले आहे. यामुळे जे युद्ध टाळण्याचे प्रयत्न सुरू होते, त्या युद्धाला आता अखेर सुरूवात झाली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची सुरूवात करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर थोड्याच वेळात युक्रेनमधील Kyiv, Kharkiv आणि आणखी काही इतर भागांमध्ये बॉम्ब हल्ले सुरू झाले आहेत. एवढेच नाही तर रशिया-युक्रेन वादात इतर कुणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील पुतीन यांनी दिला आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करु शकते असा इशारा अमेरिकेने दिल्यानंतर काही तासातच रशियाने हा हल्ला केला आहे.

पुतीन यांनी दोन दिवसांपूर्वीच रशियातील दोन प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती. या प्रांतांमध्ये बंडखोरांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या बंडखोरांच्या मदतीने रशियाने या भागात काही हल्ले देखील केले. त्यानंतर या प्रांतांमध्ये रशियाने आपले सैनिक तैनात केले होते.

दरम्यान युक्रेनने आपली सर्व विमानतळं बंद केली आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीने एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दीमत्रो कुलेबा यांनी रशियाच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. संपूर्ण जगाने पुतीन यांना रोखण्याची गरज आहे, तसेच आता कृती करुन दाखवण्याची वेळ आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Updated : 24 Feb 2022 10:26 AM IST
Next Story
Share it
Top