Home > News Update > #RussiaUkraineWar : तिसरे महायुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल- रशिया

#RussiaUkraineWar : तिसरे महायुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल- रशिया

#RussiaUkraineWar : तिसरे महायुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल- रशिया
X

युक्रेन आणि रशियामधील संघर्षामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. पण या पार्श्वभूमीवर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तर तिसरे महायुद्ध झाले तर त्यात महासंहारक अशा अण्वस्त्रांचा वापर केला जाईल आणि त्यामुळे मोठा विनाश ओढवू शकतो, असा इशारा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरो यांनी दिला आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला करुन आता ६ दिवस झाले आहेत. या हल्ल्यात रशियने सैन्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. पण युक्रेनला अण्वस्त्र उपलब्ध झाली तर तो सगळ्यात मोठा धोका असेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत, तर दुसरीकडे बुधवारी संध्याकाळी युक्रेन आणि रशिया दरम्यान चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्याने या दुसऱ्या फेरीच्या चर्चेमध्ये काय होणार, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

युक्रेनची राजधानी कीवच्या दिनेशेन आता रशियाच्या सैन्याचा ताफा निघाला आहे. जवळपास ६४ किलोमीटर लांब एवढा हा ताफा आहे. यामध्ये रणगाडे, लष्करी वाहने आहेत. पुतीन यांनी युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊन तिथे सत्ताबदल घडवायचा आहे. तसेच रशिया धार्जिणे सरकार तिथे स्थापन करण्याचा त्यांचा हेतू आहे.

पण तिकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज केला आहे आणि युरोपिय महासंघाने देखील आता युक्रेनला सभासद करुन घेण्याची तयारी केली आहे. असे झाले तर युरोपियन युनियनमधील देशांना युक्रेनला लष्करी मदत देणे शक्य होणार आहे.

Updated : 2 March 2022 12:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top