Home > News Update > #chinacoup : चीनमध्ये खळबळ, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नजरकेदैत?

#chinacoup : चीनमध्ये खळबळ, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नजरकेदैत?

#chinacoup : चीनमध्ये खळबळ, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नजरकेदैत?
X

भारत आणि चीनमधला सीमावाद अजूनही सुटलेला नाही, या पार्श्वभूमीवर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi jingping) यांची SCO परिषदेत भेट झाली. समरकंदमध्ये झालेल्या या परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये मात्र सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन एक धक्कादायक माहिती दिली आहे. "एक अफवा सध्या पसरली आहे त्याबाबत खात्री केली पाहिजे की शी जिपनिंग यांना बिजिंगमध्ये (Beijing) नजरकैदेत ठेवण्यात आले आहे का? जिनपिंग हे जेव्हा समरकंदमध्ये होते तेव्हा तिकडे देशात

चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी त्यांना जिनपिंग यांना PLA च्या प्रमुख पदावरुन हटवले आहे. त्यानंतर त्यंना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशी अफवा पसरली आहे."

चीनमध्ये काय चर्चा सुरु आहे?

काही चीनी नागरिकांनी देखील सोशल मीडियावर शी जिनपिंग यांना नजर कैदेत ठेवले असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA)आता लष्कराचा ताबा घेतला आहे, असेही म्हटले आहे. चीनबाबत वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराने याबाबत ट्विट करत PLA ची वाहनं बिजिंगच्या दिशेने निघाली आहेत, असे ट्विट केले होते. तसेच जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे का, असा सवाल उपस्थित केला होता.

दरम्यान चीन सरकारतर्फे किंवा लष्करातर्फे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या या चर्चा केवळ सोशल मीडियावर सुरू आहेत. दरम्यान अचानक ही चर्चा सुरू होण्याचे कारण काय असाही सवाल आता उपस्थित केला जातो आहे.

चर्चा सुरू होण्याचे कारण काय?

चीनमध्ये गेल्या काही दिवसात भ्रष्टाचाराविरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे. यामध्ये दोन माजी मंत्र्यांना देहदंड आणि चार अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण हे सहा जण शी जिनपिंग यांचे विरोधक होते, अशीही चर्चा आहे. त्यामुळेच शी जिनपिंग यांच्या नजरकैदेची बातमी त्यांच्या विरोधी गटातील लोकांनी पसरवल्याची चर्चा आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Updated : 24 Sep 2022 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top