Home > News Update > वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आरपीआयचे आझाद मैदानावर निदर्शने

वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आरपीआयचे आझाद मैदानावर निदर्शने

वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आरपीआयचे आझाद मैदानावर निदर्शने
X

मुंबई : अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत बनवून या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर जवळपास 30 जणांनी मागील 9 महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून , 2 अल्पवयीन आरोपींसह 23 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित 6 आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अमानूष घटना उघडकीस आल्यानंतर बहुतांश आरोपींचे पालक हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे.

या घटनेच्या विरोधात पीडितेला न्याय मिळावा व हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी आरपीआयचे अध्यक्ष संजय भाऊ पवार व रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत 15 ते 20 कार्यकर्तेसह आजाद मैदान गेटवर निदर्शन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना संगीता माने म्हणाल्या की, टीव्हीवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात महिलांकडे वाकडे नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढून हातात ठेवेन, मग अशा पद्धतीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री गेले कुठे? त्यांना त्यांच्या खुर्चीची जबाबदारी कळत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली केली पाहिजे, आंदोलने- मोर्चे केल्यानंतरच त्यांच्यापर्यंत आवाज पोहचत असेल तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असा घणाघात त्यांनी केला.

Updated : 25 Sep 2021 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top