Home > News Update > भीमा कोरेगाव घटनेवरील 'वास्तव' पुस्तक वादात, बंदीची मागणी

भीमा कोरेगाव घटनेवरील 'वास्तव' पुस्तक वादात, बंदीची मागणी

भीमा कोरेगाव घटनेवरील वास्तव पुस्तक वादात, बंदीची मागणी
X


एकीकडे भीमा कोरेगाव प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना आता एक नवीन वाद उभा राहिला आहे. रोहन माळवदकर यांनी भीमा कोरेगाव लढाईवर वास्तव नावाचे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोंडी चुकीचे वक्तव्य घालण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. भारताचे संविधान ज्या महामानवाने लिहिले त्यांच्या तोंडी चुकीचे वाक्य घातल्यामुळे भारतातील आंबेडकरी वंचित बहुजन समाज दुखावला गेला आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आरपीआयच्या खरात गटाने केली आहे.


महापुरुषाचा चुकीचा संदर्भ देऊन भारतातील जनतेचा अपमान केला आहे, त्यामे या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्वतःला लेखक समजणाऱ्या पण अवास्तव लिखाणरोहन माळवदकर यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत कायदेशीर करावी अशी मागणीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान पुस्तकावर बंदीच्या मागणीसाठी सोमवारी पुणे येथे पदा्मवती चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.






Updated : 24 Jan 2022 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top