Home > News Update > Mumbai Jaipur Train Firing : रेल्वेत गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंहची हकालपट्टी

Mumbai Jaipur Train Firing : रेल्वेत गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंहची हकालपट्टी

Mumbai Jaipur Train Firing : रेल्वेत गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंहची हकालपट्टी
X


मुंबई जयपुर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह याने चार जणांवर गोळीबार केला होता. त्याप्रकरणी चेतन सिंह याला रेल्वेने दणका दिला आहे.

मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये 31 जुलै रोजी आरपीएफ जवान चेतन सिंह याने आपल्या सिनियर अधिकाऱ्यासह चार जणांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी रेल्वेने चेतन सिंह चौधरी यावर कारवाई केली आहे.

31 जुलै रोजी चेतन सिंह चौधरी याने मुंबई जयपूर एक्स्प्रेसमध्ये आपला सिनियर अधिकारी टीकाराम मीना यांच्यासहीत तीन लोकांवर गोळीबार केला. त्यामध्ये चेतन सिंह गोळीबार करताना ‘भारत में रहेना है तो मोदी योगी कहेना होगा,’ असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे चेतन सिंह याने धार्मिक द्वेषातून हे कृत्य केल्याची चर्चा रंगली होती. त्याप्रकरणी चेतन सिंह तुरुंगात आहे. मात्र रेल्वेने RPF जवान चेतन सिंह याच्यावर कारवाई करत त्याला रेल्वेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रेल्वेने अधिकृतरित्या माहिती दिली आहे.

Updated : 17 Aug 2023 7:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top