Home > News Update > Mumbai Train:"ऑपरेशन नन्हे फरिश्ते"194 मुलांचे भविष्य सुखरूप

Mumbai Train:"ऑपरेशन नन्हे फरिश्ते"194 मुलांचे भविष्य सुखरूप

रेल्वे सुरक्षा दलाकडे(RPF) नागरिकांच्या तसेच रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षितेची जबाबदारी असते त्यांनुसार ते काम देखील करत असतात. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" हे देखील त्यांच्या कामाचाच भाग आहे.

Mumbai Train:ऑपरेशन नन्हे फरिश्ते194 मुलांचे भविष्य सुखरूप
X

मुंबई मध्य रेल्वे (Central railway) प्रशासनाने 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत 194 मुलांची सुटका केली आहे. मुंबई मधील झगमगाट पाहून घर- दार सोडून मुंबई(Mumbai) मध्ये काही मुले येतात. काही मुले ही कौटुंबिक समस्यांमुळे आणि शहरात चांगले जीवन जगता यावे म्हणून कुटूंबियांना न सागता मुबंई रेल्वे स्थानकावर येऊन राहतात. तर काही अनाथ मुले देखील यामध्ये असतात. अश्या सर्व मुलांना चांगले जीवन जगता यावे. यासाठी रेल्वे प्रशासन काही स्वयंसेवी संस्थाच्या (चाइल्डलाईन)(childline) मदतीने यांची मदत करते. आरपीफ मध्य रेल्वेने 1 मार्च 2023 ते 30 एप्रिल 2023 या कालावधी मध्ये 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत 194 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 144 मुले आणि 50 मुली आहेत. रेल्वे आरपीएफ(RPf) जवान आणि काही प्रमुख रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिळून अश्या मुलांच्या कुटुबांशी संवाद साधला आणि मुलांच्या समस्या सांगितल्या मुले देखील घरी जाण्यास तयार झाली आहेत. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल मुलांच्या पालकांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Updated : 28 May 2023 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top