Home > News Update > देव धर्मांच्या नावावर राजकारण ; 'राम मांसाहारी' वक्तव्यावर रोहित पवारांची आव्हाडांवर टीका

देव धर्मांच्या नावावर राजकारण ; 'राम मांसाहारी' वक्तव्यावर रोहित पवारांची आव्हाडांवर टीका

देव धर्मांच्या नावावर राजकारण ; राम मांसाहारी वक्तव्यावर रोहित पवारांची आव्हाडांवर टीका
X

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात प्रभू श्री राम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते, असं विधान केलं होतं. आव्हाडांच्या या विधानानंतर आता राज्यभरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या वतीने आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर राम आरती करण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याचबरोबर शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर घरचा आहेर दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी घरचा आहेरे दिला आहे ते म्हणाले की

"त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.

देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!"

त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून देव धर्मावर बोलणं सोडल पाहिजे अशा पद्धतीचं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे

Updated : 4 Jan 2024 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top