Home > News Update > रोहित पवार यांची सलग 8 तास ED ने केली चौकशी

रोहित पवार यांची सलग 8 तास ED ने केली चौकशी

रोहित पवार यांची सलग 8 तास ED ने केली चौकशी
X

बारामती agro प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेले आमदार रोहित पवार यांची सलग 8 तास ईडी ने चौकशी केली.रोहित पवार यांची चौकशीची ही दुसरी वेळ असून,या अगोदर ही एकदा रोहित पवार यांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. आणि पुन्हा 8 फेब्रुवारी ला पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं असल्याच समजत आहे.

चौकशील सहकार्य करतोय पुढेही करणार

माझ्यावर झालेल्या आरोपावरील चौकशीला मी पूर्ण सामोरं जात असून मी चौकशील पूर्ण सहकार्य करत असून पुढेही करत राहणार. ते पुढे म्हणाले की ज्या बँकेच्या कुठल्याही बॉडीवर मी नव्हतो ना त्या बँकेकडून मी कर्ज घेतलो नाही , ना माझं या नाव बँक घोटाळा प्रकरणाच्या यादीत माझं नाव होतं,ज्यांची नावं होती ते आता सत्तेत आहेत त्यांची चौकशी नाही मग माझी चौकशी का होते असा प्रश्न रोहित पवार यांनी केला.रोहित पवार यांनी काही यूट्यूब चॅनेलची केली ईडीकडे तक्रार

काही यूट्यूब चॅनेल जे नेहमी माझी बदनामी करत असून ते चॅनेल भाजप प्रेमी असून या चौकशी बद्दल विनाकारण माझी बदनामी करणारे प्रसारण या चॅनेल च्या माध्यमातून सुरू असून त्यांची चौकशी करावी याबबात त्यांची तक्रार मी ईडी केली आहे. यात काही ईडीचे अधिकारीही त्या चॅनेलच्या पत्रकरांशी संबंध ठेवून आहेत त्यांना माहिती पुरवत आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मी ईडीकडे केली आहे.

राजकारणावर कधी न बोलणाऱ्या प्रतिभा पवार दिवसभर पक्ष कार्यालयातराजकारणावर कधी न बोलणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी सौ.प्रतिभा पवार या आपल्या नातवाला धीर देण्यासाठी दिवसभर पक्ष कार्यालयात बसून होत्या. त्यांच्या सोबत त्यांची नात सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती पवार ही दिवसभर पक्ष कार्यालयात बसून होत्या. एरव्ही कधीही राजकारणावर न बोलणाऱ्या कुठल्या ही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या प्रतिभा पवार पक्ष कार्यालयात उपस्थित राहून रोहित पवार यांना धीर दिला.

Updated : 2 Feb 2024 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top