Home > News Update > भरदिवसा पतसंस्थेवर दरोडा, मॅनेजरची गोळ्या घालून हत्या

भरदिवसा पतसंस्थेवर दरोडा, मॅनेजरची गोळ्या घालून हत्या

भरदिवसा पतसंस्थेवर दरोडा, मॅनेजरची गोळ्या घालून हत्या
X

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे एका पतसंस्थेवर भरदिवसात दोघांनी दरोडा घालत मॅनेजरची हत्या केली आहे. अनंत नागरी बिगर शेती पतसंस्थेवर बुधवारी दुपारीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. या घटनेत पैसे देण्यास विरोध करणाऱ्या व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांच्यावर एकाने गोळीबार केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पतसंस्थेत दुपारच्या वेळी दीड वाजण्याच्या सुमारास स्टाफ जेवण करत असताना दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर आले आणि पतसंस्थेत घुसले. त्यावेळी त्यांनी व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशांची मागणी केली, पण त्यांनी विरोध केल्याने त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. राजेंद्र भोर यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. नारायणगाव पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पतसंस्थेतून किती रक्कम चोरीला गेली याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान US चोरटे पुण्याच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळते आहे.


Updated : 24 Nov 2021 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top