Home > News Update > राज्यस्थानच्या राजकीय नाट्यावर रितेश देशमुखचं ट्विट...

राज्यस्थानच्या राजकीय नाट्यावर रितेश देशमुखचं ट्विट...

राज्यस्थानच्या राजकीय नाट्यावर रितेश देशमुखचं ट्विट...
X

राजस्थान मध्ये राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वाद सुरु आहे. या वादामुळे सचिन पायलट सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश देशमुख हे कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहे. त्यांचे भाऊ सध्याच्या ठाकरे सरकार मध्ये मंत्री आहेत. घोडेबाजारी चा विचार करता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले. आणि त्यांना रिसॉर्टवर नेण्यात आलं आहे.

या राजकीय नाट्यावर सध्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया उटमत आहेत, रितेश देशमुखांनीही यावर दोन शब्दात भाष्य केलं आहे. 'शेवटचा उपाय' असं रितेश यांनी ट्विट केलं आहे..

Updated : 13 July 2020 2:11 PM GMT
Next Story
Share it
Top