Home > News Update > आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ ; देशात दर स्थिर

आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ ; देशात दर स्थिर

भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. देशात आज सलग 50व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ ; देशात दर स्थिर
X

मुंबई// भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. देशात आज सलग 50व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी 4 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा आहे. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. नंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार आजही देशात सर्वात मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलचे दर 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. तिकडे पुण्यात पेट्रोलचे दर 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे दर 92.25 रुपये प्रति लिटर इतके आहे.

Updated : 24 Dec 2021 2:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top