Home > News Update > इंधनाचे दर वाढल्याने जनतेचा उद्रेक, हिंसाचारात १६४ जणांचा मृत्यू

इंधनाचे दर वाढल्याने जनतेचा उद्रेक, हिंसाचारात १६४ जणांचा मृत्यू

इंधनाचे दर वाढल्याने जनतेचा उद्रेक, हिंसाचारात १६४ जणांचा मृत्यू
X

वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाचे दर दुप्पट झाल्याने जनतेचा उद्रेक झाला आणि त्यात दीडशेच्यावर लोक मारले गेले आहेत, कझाकिस्तानमध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये जवळपास १६४ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन हजारपेक्षा जास्तत लोक जखमी झाले आहेत. २ जानेवारी रोजी कझाकस्तानमध्ये इंधनाचे दर वाढल्यानंतर लोकांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली होती, त्यातून हिंसाचारही झाला होता. याप्रकरणी ८ हजार लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितची कझाकस्तानमधील पोलिसांनी दिली आहे. सध्या देशातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तिथल्या सरकारने सांगितले आहे. या हिंसाचारानंतर सरकारला इंधनाचे दर कमी करावे लागले आहेत.

कझाकस्तानमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात अनेक सरकारी इमारती आणि सरकारी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. देशातील सगळ्यात मोठे शहर अल्माटी इथे तर आंदोलकांनी विमानतळ ताब्यात घेतले होते. तर शहरात काही ठिकाणी गोळीबार देखील झाला होता. मृतांमध्ये नागरिक किती आणि सुरक्षा रक्षक किती होते याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कझाकस्तानच्या सरकारने या आंदोलनामागे परकीय अतिरेक्यांचा हात असल्याचा दावा केला आहे. पण या आंदोलनाचे नेतृत्व कुणीही करताना दिसलेले नाही. कझाकस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आंदोलन शांततेत सुरू होते पण दहशतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी यात घुसखोरी करत हिंसाचार केला असा दावा केला आहे.

Updated : 12 Jan 2022 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top