Home > News Update > 'Revange Porn' चे व्हिडीओ व्हायरल, सायबर विभागाची करडी नजर

'Revange Porn' चे व्हिडीओ व्हायरल, सायबर विभागाची करडी नजर

Revange Porn चे व्हिडीओ व्हायरल, सायबर विभागाची करडी नजर
X

रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्यामध्ये सध्या वाढ होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खामगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणे व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून, खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्ह्याचे प्रकटीकरण करण्यासाठी सायबर विभागाची मदत घेतली जात आहे. लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे आरोपी जेरबंद केले जातील असा इशारा खामगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे.

काय आहे Revange Porn ?


एकमेकांच्या प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणय दृश्य रेकॉर्ड करतात. आपल्या जोडीदाराला आपले नग्न फोटो पाठवतात. प्रेमामध्ये सर्व काही अलबेल आहे तोपर्यंत काही होत नाही. मात्र, जेंव्हा या प्रेमवीर जोडप्याचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या प्रेमवीरांकडून हे जूने व्हिडिओ, फोटोचा गैरवापर केला जातो. यातूनच Revange Porn ने जन्म घेतलाय. रजत नगरी खामगावात सध्या असेच काही व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. आता हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस प्रशासन सायबर विभागाच्या मदतीने घेत आहे. आपल्या पूर्व जोडीदाराचे लग्न झाल्यानंतर अथवा त्याने नवा जोडीदार निवडल्यानंतर त्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी हा प्रकार करण्यात येतोय. प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणयदृष्य, एकमेकांना पाठवलेले नग्न फोटो, सोबतचे व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केली जातात. एकमेकांना बदनाम करण्यासाठी या अशा मार्गाचा अवलंब करणं याला सायबरक्राईमच्या भाषेत ‘रिव्हेंज पॉर्न' असे म्हणतात.

Updated : 28 March 2024 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top