Home > News Update > Pune Rain : पुणे शहरात पावसाचे जोरदार बॅटींग

Pune Rain : पुणे शहरात पावसाचे जोरदार बॅटींग

Pune Rain : गेल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी आलेल्या पावसाने पुणे (Pune city) शहरात जोरदार बॅटींग केली. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Pune Rain : पुणे शहरात पावसाचे जोरदार बॅटींग
X

यंदा ऑक्टोबरचे 15 दिवस सरले तरी राज्यातून मान्सून परतला (Monsoon Return) नाही. त्यातच गेल्या आठवडाभरापासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारी 3 वा. पुणे शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

हवामान विभागाने (IMD) पुणे शहराला दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. त्याबरोबरच मुंबई (Mumbai Rain), ठाणे, पुणे, अहमदनगर, नवी मुंबई सह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. (Mumbai, Pune, Thane, Ahmednagar, Navi Mumbai Rain)

राज्यातील अनेक भागांतून मान्सूनची माघार (Monsoon Return from maharashtra)

भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या मान्सूनची माघार जाहीर केली आहे. त्यामध्ये उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गुजरातमधील उर्वरित भागांमधून व मध्यप्रदेशातील बहुतांश भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड व महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली आहे. माघारीची रेषा, रक्सौल, डाल्टनगंज, पेंद्र रोड, छिंदवाडा, जळगाव, डहाणू यासह 3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनच्या माघारीची शक्यता आहे, असं हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

Updated : 14 Oct 2022 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top