Home > News Update > न्यायस्तंभ हरवला : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

न्यायस्तंभ हरवला : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

न्यायस्तंभ हरवला : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं  निधन
X

माजी न्यायमुर्ती पी. बी. सावंत यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहणाऱ्या पी. बी. सावंत यांनी सेवा निवृत्तीनंतर समाजकार्य सुरु केले. पुण्यातील एल्गार परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

कडक शिस्तीचे न्यायाधीश अशी त्यांची ओळख होती. 2003 ला कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी एक आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी दिलेल्या अहवालामुळे आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घरी जावं लागलं होतं. या संदर्भात घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांनी दु;ख व्यक्त केलं आहे.

न्या पी बी सावंत सर, आमच्या आठवणीत तुम्ही नेहमी असाल. नवीन वकिलांना सामाजिक न्यायासाठीचा दृष्टीकोन समजावून सांगायला आमच्या सोबत नेहमी मार्गदर्शक म्हणून तुम्ही असायचे. न्यायिक सुधारणांसाठी आग्रही मत मांडणारा, आरक्षण विषयांवरील महत्वाच्या निर्णयांमधील एक सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून, कधीही फोन केला की त्वरित कायद्याचा अनव्यार्थ बरोबर की चूक याबद्दल कॉन्फर्मेशन देणारा न्यायस्तंभ आता आमच्यात नाही. अशा शब्दांत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

Updated : 15 Feb 2021 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top