Home > News Update > कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस ना घेतलेल्यांवर निर्बंध?उपमुख्यमंत्री पवार यांचे सूतोवाच

कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस ना घेतलेल्यांवर निर्बंध?उपमुख्यमंत्री पवार यांचे सूतोवाच

कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस ना घेतलेल्यांवर निर्बंध?उपमुख्यमंत्री पवार यांचे सूतोवाच
X

मुंबई // कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्या राज्यामध्ये जवळपास पावणेदोन कोटी आहे. त्यामुळे दुसरी लस टाळणाऱ्यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र, दुसरी मात्रा घेण्यात बरेच जिल्हे मागे आहेत. मुदत उलटूनही जवळपास दीड ते पावणेदोन कोटी नागरिकांनी लशीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुसरी लसमात्रा घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.

देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लससाठा आहे. लस उपलब्ध असतानाही काही नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओमिक्रॉनबाबत कोरोनाविषयक कृती दलाशी चर्चा केली. ओमिक्रॉनबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेला डोंबिवलीतील रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर कोणीही बाधित झालेला नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.

Updated : 10 Dec 2021 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top