Home > News Update > अहमदनगर जिल्ह्यात कोरोना वाढला ; 13 तारखेपर्यंत 'या'गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना वाढला ; 13 तारखेपर्यंत 'या'गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना वाढला ;  13 तारखेपर्यंत यागावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद
X

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने आजपासुन (दि. 4 ऑक्टोबर) ते 13 ऑक्टोबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता

इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. तब्बल 11 तालुक्यातील जवळपास 60 गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लावले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर , पाथर्डी, राहाता, संगमनेर,शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यातील काही गावांचा यात समावेश आहे.

दरम्यान दवाखाने ,मेडिकल , टेस्टिंग सेंटर आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेशित केले आहे. अकोले तालुक्यातील लिंगदेव, परखतपुर, विरगाव, कर्जत तालुक्यातील खांडवी, बाभूळगाव दुमाला, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव, पारनेर तालुक्यातील वडणेर बु।। ,कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री, भगवतीपुर,अस्तगाव, कोऱ्हाळे, लोणी बु।।, लोणी खु।। कोल्हार बु।।, संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु।। ,आश्वी खु।।,पानोडी, पारेगाव बु।। शिबलापूर, बोटा,उंबरी, पिंपरणे,वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी,कोल्हेवाडी , वडगाव लांडगा,तळेगाव, घारगाव, कनोली, चंदनापुरी, निमोनी, वडगाव पान,सायखिंडी शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव, घोटण,दहिगावने,आव्हाने बु।।, श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी,मढेवडगाव, येळपणे, शेडगाव,कौठा, कोळगाव, काष्टी तसेच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खु।।, उक्कलगाव आणि कारेगाव या गावांमध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी निर्बंध लागू केले आहेत.

दरम्यान नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाचे नियम पाळावे आणि खबरदारी घ्यावी असे आव्हान प्रशासनाकडुन करण्यात येते आहे.दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे डीवायएसपी राहुल मदने यांनी म्हटले आहे.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा आजपासून सुरू होत असताना दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 60 गावांमध्ये निर्बंध लावण्यात आले असल्याने अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शाळा सुरू होणार नाहीत.

Updated : 2021-10-04T11:38:04+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top