Home > News Update > Rain Update : नर्मदा नदी धोक्याचा पातळीवर.....

Rain Update : नर्मदा नदी धोक्याचा पातळीवर.....

पाणी पातळीत वाढ होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदी काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा...

Rain Update : नर्मदा नदी धोक्याचा पातळीवर.....
X

मध्यप्रदेश आणि सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीला पूर आला असून नर्मदा नदीने धोक्याची पातळी वरून वाहत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या असून नर्मदा काठावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे सरदार सरोवर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत, धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग होत असल्याने गुजरात मधील अंकलेश्वर ही पाण्यात गेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे नर्मदा नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ झाल्यास नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदी काठावरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Updated : 18 Sep 2023 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top