Home > News Update > ...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही: महापौर किशोरी पेडणेकर

...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही: महापौर किशोरी पेडणेकर

...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही: महापौर किशोरी पेडणेकर
X

मुंबई जर पुन्हा लॉकडाऊन झालं तर सर्वसामान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने तसेच राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करत मुंबईकरांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा अशी रुग्ण संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन शिवाय कोणताही पर्याय राहणार नाही, असे वक्तव्य मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

महापौर म्हणाल्या की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, येथील प्रत्येक दुकानदाराला फेसशिल्ड देण्याबाबत मॉलच्या व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, इतर मॉलनी सुद्धा याप्रकारे खबरदारी घेणे गरजेचे असून या सर्व बाबींसाठी नागरिकांचे सहकार्य मिळणेही तेवढेच गरजेचे असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर सांगितले.


Updated : 23 March 2021 9:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top