Top
Home > News Update > रिपब्लिकच्या पत्रकाराला चोपले

रिपब्लिकच्या पत्रकाराला चोपले

रिपब्लिकच्या पत्रकाराला चोपले
X

पत्रकारितेचे सर्व संकेत आणि मुल्य पायदळी तुडवणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील एका पत्रकाराने इतर पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. सुशांत सिंह प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट पुढे येत आहे. यासंदर्भात सध्या नार्कोटिक्स ब्युरो ऑफिसच्या बाहेर पत्रकार दररोज रिपोर्टिंगसाठी उपस्थित आहेत.

पण गुरूवारी सकाळी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराने इतर सर्व माध्यमांच्या पत्रकारांना चाय-बिस्किटवाले गरिब पत्रकार म्हणून संबोधल्याने इतर पत्रकारांचा संताप झाला. यानंतर इतर पत्रकारांनी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला जाब विचारला असता यावेळी धक्काबुक्की झाली.

दरम्यान प्रदीप भंडारी नावाच्या ज्या रिपोर्टरला मारहाण झाली त्यांनी ट्विटरवर इतर पत्रकारांरच आरोप केले आहे.

NCB आँफिस समोर कव्हरेज करताना रिपब्लिक चँनलच्या पत्रकार दररोज आरडा ओरडा करून कव्हरेज करत असतात... त्यामुळे इतर चँनलच्या पत्रकारांना लाईव्ह आणि कव्हरेज करताना अनेकदा अडचणी येतात. त्यातच आज कव्हरेज सुरू असताना रिपब्लिक चँनलच्या पत्रकारांनी मुंबईकर पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार असे हिनवले त्यामुळे मुंबईकर पत्रकार संतापले आणि दिल्लीहून आलेल्या रिबप्लिक चँनलच्या आरडा ओरडा करणार्या पत्रकारांची चांगलीच धुलाई केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याच्या प्रयत्नं केला.

Updated : 24 Sep 2020 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top