Home > News Update > प्रसिद्ध उद्योजक Gautam Adani यांनी स्वतःच्या आयुष्याचा प्रवास उलगडला...

प्रसिद्ध उद्योजक Gautam Adani यांनी स्वतःच्या आयुष्याचा प्रवास उलगडला...

प्रसिद्ध उद्योजक Gautam Adani यांनी स्वतःच्या आयुष्याचा प्रवास उलगडला...
X

प्रसिध्द उद्योजक गौतम अदानी (gautam adani)हे जगातील ३ रे सर्वाधिक श्रींमत व्यक्ती आहेत. गौतम अदानी हे अदानी ग्रुपचे (Adani Group) चेअरमन असुन ते अनेक कंपन्याचे मालक देखील आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार त्यांची एकुण संपत्ती ही ११७ अरब डॉलर आहे. गौतम अदानी हे अदानी एंटरप्राइजेज, अडाणी विल्मर, अदानी पावर यासारख्या कंपनी चालवत असुन देशात मोठा व्यवसाय़ चालवत आहे.

गौतम अदानी हे गुजरातमधील विद्यामंदिर ट्रस्टला आज ७५ वर्षे पूर्ती झाल्याबद्दल एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना अडाणी म्हणाले की, मला आज खुप आंनद होत आहे की , मी आज माझ्या भुमीत आलो आहे. मी माझी माती आणि माझ्या गावाला वंदन करतो. शिक्षण आपल्याला जीवनातील अडचणीतुन बाहेर पडण्याचे मार्ग सांगतो.माझे बनासकांठामधील बालपणीचे दिवस मला आठवण करून देतात की माझ्या आईवडीलांनी मला चांगले संस्कार दिले , मला आदर्श जीवन जगायला शिकवले .मी मागे वळून पाहतो तेव्हा त्यांनी शिकवले मुल्यातून मी माझा जीवनाचा मार्ग शिकवला.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखत मध्ये अदानी म्हणाले,गौतम अदानी म्हणाले की, भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांमध्ये आम्ही काम करत आहोत. या राज्यांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आहे. अदानी समूहाची गुंतवणूक आज २२ राज्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत. केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार, बंगालमध्ये ममतादीदी, नवीन पटनायकजी, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांच्यासोबतही आम्ही काम करत आहोत.जिथे जिथे प्रादेशिक पक्षांची सरकारं आहेत, तिथे आम्ही काम करत आहोत... मी आज आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यापैकी कोणत्याही सरकारने आमच्यासमोर कोणतीही समस्या निर्माण केली नाही, असही अदानी यांनी म्हटलं.

आदानी पुढे म्हणाले,मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही... तुम्ही त्यांच्याशी धोरणाबद्दल बोलू शकता, देशहितासाठी चर्चा करू शकता, पण जे धोरण तयार केलं जातं ते प्रत्येकासाठी आहे, ते एकट्या अदानी समूहासाठी नाही, असही अदानी म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी क्रोनी कॅपिटलिझमबाबत केलेल्या आरोपावर अदानी म्हणाले की, तो राजकारणाच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे, असे मला वाटते.

गौतम अदानीचे सांगितले ,यश मिळवून देणारे तत्वज्ञान

गौतम अदानीनी कार्यक्रमात बोलत असताना सांगितले की, माझ्या उद्योगातील यश मिळण्याचे कारण मी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अतिविचार केला नाही.१९८५ च्या निवडणुकीनंतर राजीव गांधी यांनी उद्योगाना वेगळा दृष्टीकोन दिला . 1991 मध्ये, भारतासाठी एक अतिशय कठीण काळात देखील त्यावेळी मी माझे ट्रेडिंग हाऊस केवळ ग्लोबल केले नाही तर ते 2 वर्षांत सर्वात वेगाने वाढणारे ट्रेडिंग हाउस बनवले. त्यानंतर पॅ Adani, , मेटल आणि ऑटो क्षेत्रात प्रवेश केला आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणुन अदानी समुह आहे.

Updated : 8 Jan 2023 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top