Home > News Update > Mumbai Monsoon मुंबईला दिलासा; तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

Mumbai Monsoon मुंबईला दिलासा; तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहणारा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पहिलाच तलाव पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ३९.६१ टक्के जलसाठा उपलब्ध

Mumbai Monsoon मुंबईला दिलासा; तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला
X

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज मध्यरात्री १.२८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, ती माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला तुळशी हा पहिला तलाव ठरला आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या २ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. तर हा तलाव बोरिवली पश्चिम परिसरात परिसरात आहे,

अशीही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ व सन २०२१ मध्ये १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर वर्ष २०२० मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९ मध्ये दिनांक १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी; वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर (३३ लाख ६०५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर (८१ हजार २१४ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. तर तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर (१,०३,०३१ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे.

‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा)

९८०९.५ कोटी लीटर (९८ हजार ९५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे.

भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर (२,३१,९२० दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. तर विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर (१७ हजार ७२७ दशलक्ष लीटर) पाणीसाठा आहे. तर आज रात्री भरून वाहू लागलेल्या तुळशी तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Updated : 20 July 2023 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top