Home > News Update > फडणवीसांवर आक्षेपार्य टीका करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपचा आक्रमक पवित्रा

फडणवीसांवर आक्षेपार्य टीका करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपचा आक्रमक पवित्रा

फडणवीसांवर आक्षेपार्य टीका करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपचा आक्रमक पवित्रा
X

आमदार संजय गायकवाड यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या अक्षेपार्य विधानावर भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी टीका केली असून आमदार संजय गायकवाड यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावा. अन्यथा भाजपा कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांना सबक शिकवतील. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस राहतील. असा इशारा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या भयानक काळात भाजपचे चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे नीच राजकारण करत असून मला जर कोरोणाचे जंतू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते. असे संतापजनक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated : 18 April 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top