Home > News Update > बोगस बियाण्यांच्या कंपनीकडून पैसे वसूल करा: देवेंद्र फडणवीस

बोगस बियाण्यांच्या कंपनीकडून पैसे वसूल करा: देवेंद्र फडणवीस

बोगस बियाण्यांच्या कंपनीकडून पैसे वसूल करा: देवेंद्र फडणवीस
X

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 जून नंतरही लॉकडाऊन कायम राहील असे काल सांगितले मात्र याबाबतची मुख्यमंत्र्यांची भूमिका अस्पष्ट असून अनलॉक म्हणजे नेमके काय हे मुखमंत्र्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आज अमरावती येथे कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थेची पाहणी आणि व्हीएमव्ही महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटर ला भेट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस अमरावती येथे आले असता यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळा शिवाय विदर्भ आणि मराठवाडा विभागाला न्याय मिळू शकत नाही.आमच्या सरकारने मंडळाला पाच वर्षे मुदतवाढ दिली होती,राज्य सरकारने तात्काळ विदर्भ वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी करत विदर्भातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळात याबाबत आवाज उठवून विदर्भाला न्याय मिळवून द्यावा असे फडणवीस म्हणाले.

कापूस खरेदी संदर्भात मोठ्या प्रमाणात राज्य सरकार फेल झाले असून कापूस खरेदीचे सर्व पैसे केंद्रसरकार द्यायला तयार असतांना तीन वेळा वाढीवमुदत देऊनही राज्य सरकार शेतकऱ्यांचा घरात पडलेला कापूस खरेदी करू शकले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी आणि बोगस बियाण्या संदर्भातील कायद्याप्रमाने खाजगी असो वा महाबीज असो त्यांच्या विरुद्ध कायद्या अंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन,उत्पादन क्षमतेच्या हमीभावा नुसार जो काही भाव आहे ते पैसे त्या बियाणे कंपनी कडून वसूल करण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

Updated : 29 Jun 2020 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top