Home > News Update > राज्यात पुन्हा कोरोना विस्फोट!, गेल्या चोवीस तासात 39 हजार 544 नव्या रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडाही 200 पार

राज्यात पुन्हा कोरोना विस्फोट!, गेल्या चोवीस तासात 39 हजार 544 नव्या रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडाही 200 पार

राज्यात पुन्हा कोरोना विस्फोट!, गेल्या चोवीस तासात 39 हजार 544 नव्या रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडाही 200 पार
X

देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्राला गेली दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने उसळी घेतली आहे.चोवीस तासात 39 हजार 544 नव्या रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडाही 200 पार पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढून राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 28,12,980 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,00,727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 39544 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


मुंबईला कोरोनाचा विळखा

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 41,47,773 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 352163 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 49953 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

ठाण्यात आतापर्यंत 5970 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,39,590 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 293897 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 5970 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 39,692 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यात तब्बल 64277 रुग्णांवर उपचार सुरु

पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 64277 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8325 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 536262 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 463611 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला

मुंबई शहरात आज दिवसभरात 5,394 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथे दिवसभरात 3,130 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात मुंबईत 15 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,14,714 वर पोहोचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,50,660 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 51,411 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,686 जणांचा मृत्यू झाला आहे.

टास्कफोर्सच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनडच्या तयारीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.परंतु कडक लॉकडाऊन असावा अशी अपेक्षा मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील आता संभ्रमावस्थेत आहे.

सरसकट लॉकडाउन करण्यापेक्षा गर्दीचे ठिकाण नियंत्रित करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यावर राज्य सरकारचा यापुढील काळात भर असणार आहे. मात्र, लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून कोरोना चाचणी, कोरोना प्रतिंबधक उपाय पाळण्यावर सरकारने जोर द्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकार आगामी काळात कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Updated : 31 March 2021 5:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top