Home > News Update > WestBengal जनतेच्या भल्यासाठी मोदींच्या पाया पडेल: ममता बॅनर्जी

WestBengal जनतेच्या भल्यासाठी मोदींच्या पाया पडेल: ममता बॅनर्जी

WestBengal जनतेच्या भल्यासाठी मोदींच्या पाया पडेल: ममता बॅनर्जी
X

ममता बॅनर्जी आणि भाजप यांचा वाद निवडणुकीनंतरही शमताना दिसत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या काळात दोनही नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर मोदी आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली. मात्र, या भेटी दरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या 'यास' चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. या आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि शेजारील ओडिशा राज्यात मोठं नुकसान झालं आहे. याची पाहणी मोदी यांनी केली.

त्या दरम्यान मोदींनी पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील कलाकुंडा हवाई तळावर शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची 15 मिनिट भेट घेतली. या भेटीत चक्रीवादळ यासमुळे झालेल्या नुकसानीचे आकलन करण्यात आले. मात्र, या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुमारे 30 मिनिटे वाट पाहावी लागली. ममता बॅनर्जी पंतप्रधानांना भेटल्या आणि कागदपत्रे देऊन ते तेथून निघून गेल्या.

त्यानंतर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दिक हल्ला करीत आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. राजनाथ सिंह, जेपी नड्डा, सुवेंदु अधिकारी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पंतप्रधानपदाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

काय म्हटलंय भाजपने?

मुख्यमंत्री आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी कठोर, गर्विष्ठ आणि सर्वोच्च दुर्लक्ष करतात. त्यांनी आपल्या क्षुल्लक वागण्यावरून संघराज्यवादाची निंदा केली आहे, राज्यपाल जगदीप धनखार यांनी थेट ममता बॅनर्जींवर पंतप्रधानांचा "बहिष्कार" केल्याचा आरोप केला आहे.

भाजपच्या या सर्व आरोपांना ममता यांनी उत्तर दिलं आहे...

"मला वाईट वाटलं. पीएमओने प्रसारित केलेली एकतर्फी माहिती चालवून त्यांनी माझा अपमान केला. जेव्हा मी काम करत होते, तेव्हा ते हे करत होते. जनतेच्या हितासाठी मी तुमचे पाय धरायला तयार आहे. मात्र हे सूडाचे राजकारण थांबवा. अशाप्रकारे माझा अपमान करू नका. बंगालला बदनाम करू नका. माझे CS, HS आणि FS प्रत्येक वेळी बैठकीत सहभागी होत आहेत. ते केंद्रासाठी काम करत आहेत, ते राज्यासाठी कधी नोकरी करणार? तुम्हाला वाटत नाही का? हा राजकीय प्रतिशोध आहे.

गुजरातमध्ये विरोधी पक्षाला का बोलवत नाहीत?

आमची काय चूक होती? मागील दोन वर्षांत विरोधी संसदीय विरोधी नेत्यांची का आवश्यकता भासली नाही किंवा गुजरातमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना (बैठकीत) का बोलावलं जात नाही? जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपालांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत भाष्य केलं व केंद्राची पथकं पाठवली गेली होती.

आमच्याशी असं का वागता?

"आम्हाला जबरदस्त विजय मिळाला आहे म्हणून तुम्ही असे वागता आहात? तुम्ही सर्व काही करण्याचा प्रयत्न केला आणि हरला. तुम्ही रोज आमच्याशी भांडत का आहात?" असा सवाल ममता यांनी केला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सर्व हातखंडे वापरुन देखील विजय मिळाला नव्हता. त्यानंतर ममता आणि मोदी यांची झालेली ही भेट त्यामुळं महत्त्वाची मानली जात होती.

मोदी आणि ममताची शेवटची बैठक…

कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांची शेवटची बैठक 23 जानेवारी रोजी झाली होती. त्या संध्याकाळी ममता बॅनर्जी यांच्या भाषणादरम्यान "जय श्री राम" च्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यानंतर त्यांनी रागाने आपले भाषण पूर्ण न करता त्या स्टेजवरून निघून गेल्या होत्या.

Updated : 29 May 2021 2:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top