Home > News Update > सर्वसामान्यांचं गाडीचं स्वप्न महागणार,EMI मध्ये मोठी वाढ

सर्वसामान्यांचं गाडीचं स्वप्न महागणार,EMI मध्ये मोठी वाढ

सर्वसामान्यांचं गाडीचं स्वप्न महागणार,EMI मध्ये मोठी वाढ
X

वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केली आहे.रेपो दर वाढवल्यामुळे कर्जे महागणार आहेत.रिझर्व्ह बॅंकेच्या पॉलिसी मॉनटरिंग समीतीने रेपो दरात ४० बीपीएसने वाढ केली आहे.आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत ही रेपो दरवाढीची माहिती दिली.

देशातील महागाई दर सातत्याने वाढत आहे.या महागाईचा फटका आता देशातील कर्जदारांना बसणार आहे.RBI ने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता रेपो दर ४ % वरुन वाढवून ४.४० % करण्यात आला आहे.म्हणजेच EMI आणि कर्ज महागणार आहे.मे २ आणि ३ मे रोजी रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.पतधोरण आढावा बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते.

या आर्थिक वर्षाची पहिली बैठक गेल्या महिन्यात ६-८ एप्रिल रोजी झाली होती.पुढील बैठक जूनमध्ये होणार होती.दरम्यान याआधी २२ मे २०२० रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता.तेव्हापासून रेपो दर ४% या ऐतिाहासिक नीचांकी पातळीवर आहेत.मात्र आता रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.

रेपो दर म्हणजे काय ?

ज्या दराने बॅंकाना आरबीआयच्या वतीने कर्ज दिले जाते.तर बॅंकानी त्यांच्याकडील पैसे RBI कडे ठेवले तर त्या बॅंकाना रिझर्व्ह बॅंक जे व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते. दरम्यान रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करताच त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला. तर, निफ्टी 330 अंकानी कोसळला. रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा करताच शेअर बाजार कोसळला.

Updated : 4 May 2022 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top