Home > News Update > रवींद्र महाजनी आणि नितीन देसाई मराठीतील या नामवंत कलाकारांच्या नशिबी असं मरण का ?

रवींद्र महाजनी आणि नितीन देसाई मराठीतील या नामवंत कलाकारांच्या नशिबी असं मरण का ?

रवींद्र महाजनी आणि नितीन देसाई  मराठीतील या नामवंत कलाकारांच्या नशिबी असं मरण का ?
X

प्रसिद्ध सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांचा त्यांच्या राहत्या घरी मृतदेह सापडला. मृत्यूनंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली गेली. यशाचं शिखर गाठलेल्या या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर यशाच्या शिखरावर वावरणाऱ्या आणखी एका मराठी कलाकाराच्या संशयास्पद मृत्यूने मराठी मनाला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही कलाकारांच्या मृत्यूमागे नक्की काय गूढ आहे ? याचा शोध सध्या सुरू आहे.

नितीन देसाई यांनी कर्जत मधल्या त्यांच्या ND स्टुडिओतील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी बुधवारी सकाळी समोर आली. नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली गेली. अनेक सिने कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अक्षय कुमार ने तर आपल्या Oh My God चित्रपटाच्या ट्रेलरचं रिलीज ही थांबवलं. मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे यांच्या सह असंख्य सिने कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सगळीकडे एकाच प्रश्नावर चर्चा सुरू होती आणि ती म्हणजे मराठीतील या नामवंत कलाकारांच्या नशिबी असं मरण का ?

नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ (ND Studio) हा कुठल्याही स्वप्ननगरी पेक्षा काही कमी नव्हता. नाविन्य, कल्पनाशक्ती, भव्यता यामध्ये नितीन चंद्रकांत देसाई यांचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. अभिनेता अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित यांचं तर ND स्टुडीयो हे आवडीचं ठिकाण. अवास्तव कर्ज झाल्यामुळे या स्टुडिओवर जप्ती आणण्याची प्रकिया सुरू झाली होती. याचं प्रचंड दडपण नितीन देसाई यांच्यावर होते. कर्ज वसूली करणाऱ्यांच्या तगाद्यामुळे तर नितीन देसाईंनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. कर्ज वसुलीच्या तगाद्यांसदर्भात रिजर्व बँक आणि अर्थ मंत्रालयाने वारंवार सूचना जारी केल्या आहेत, मात्र तरीही अनेकदा कर्जवसुलीसाठी दबाव निर्माण केला जातो. नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला लागोपाठ दोन हादरे बसल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आर्थिक नियोजनाबाबत ही आता विविधांगी चर्चा सुरू झाल्या आहे. गोष्ट पैशापाण्याची पुस्तकामध्ये हुशार माणूसही हरतो तेव्हा या शीर्षकाखाली अशा तणावांची चर्चा करण्यात आली आहे. इंटेलिजन्स आणि इमोशनल कोशंट यावरच बहुधा सर्व बुद्धीमंतांची चाचणी होते, परंतु वास्तविक आयुष्यात फायनान्शिअल कोशंट शिवाय सर्व व्यर्थ आहे. आर्थिक अन् व्यावसायिक आयुष्य वाटते तितके सोपे नाही. काटेरी वाट आहे, जपून पावले टाका. Business is serious affair, Don’t do it for fun or just because others are doing. अशा आशयाची चर्चा या पुस्तकात प्रफुल्ल वानखेडे यांनी केलेली आहे. आर्थिक बाबी, त्यांचे परिणाम, धोके, तणाव पचवायची ताकद असेल तरच पुढे या असं प्रफुल्ल वानखेडे या पुस्तकात लिहितात. रवींद्र महाजनी आणि नितीन देसाईंच्या (Nitin Desai) निमित्ताने आर्थिक नियोजनावर ही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. पोलिसांना अद्यापही फॉरेन्सिक रिपोर्ट मिळालेला नाही. आर्थिक गुंतवणुकीच्या एका जाहीरातीवरून ते ही तणावाखाली होते, असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले होते. एकूणच तणावामुळे मराठी सिने क्षेत्राने दोन मोठे कलाकार गमावले आहेत.

Updated : 2 Aug 2023 4:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top