Home > News Update > रविकांत तुपकरांच्या अटकेचे तीव्र पडसाद ; बुलडाण्यात आंदोलनाला आक्रमक वळण

रविकांत तुपकरांच्या अटकेचे तीव्र पडसाद ; बुलडाण्यात आंदोलनाला आक्रमक वळण

रविकांत तुपकरांच्या अटकेचे तीव्र पडसाद ; बुलडाण्यात आंदोलनाला आक्रमक वळण
X

बुलडाणा : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही, अशी प्रतिज्ञा करीत आता ही 'करो या मरो'ची लढाई सुरू झाली असल्याचे तुपकर यांनी सांगितले होते. मात्र , काल रात्री तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद उमटला सुरुवात झाली. बुलडाण्यातील देऊळघाट आणि देऊळगाव मही येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळत अटकेचा निषेध केला. त्यामुळे या आंदोलनाला आता आक्रमक वळण लागल्याचे दिसत आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचे उपस्थितांनी म्हटले आहे.

Updated : 18 Nov 2021 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top